मुंबई - मालाड मालवणीतील म्हाडा वसाहतीच्या घाण पाण्याचा प्रश्न अखेर सुटला. पालिका पी उत्तर विभागाने 7 दिवसात रात्रं दिवस काम करत घाण पाण्याचा स्त्रोत शोधून काढला. 25 कर्मचारी आणि 6 अभियंते यांनी उप अभियंता जल व्ही. एस. कोरे. यांच्या नेतृत्वात व सहायक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी जलगळती शोधून 900 एम एम व्यासाच्या व्हॉल्व्ह दुरुस्ती करून गळती थांबविली. घाण पाण्याचा मार्गही बंद केल्याने म्हाडा वसाहतीमधील 50 इमारती व 150 बैठ्या चाळीतील 40 ते 45 हजार नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दिनांक 30 मार्च रोजी सकाळ आणि मुंबई टुडेमध्ये या समस्ये बाबत दोन बातम्या सकाळमध्ये प्रसिद्ध झाल्याने पालिका पी उत्तर विभागाने दिवस रात्र एक करून हे काम केले. याबाबत म्हाडावासी निवडणुकीवर बहिष्कार घालणार होते. मात्र वेळ राहता पालिकेने समस्या सोडवल्याने नागरिक समाधानी आहेत. (व्हिडिओ - निसार अली) #mumbai #mhada

Please Like ✔ | Share ✔ | Subscribe ✔
Never miss an update do hit the

Find us here
ताज्या बातम्यांसाठी : www.esakal.com
'सकाळ' फेसबुक : https://www.facebook.com/SakalNews/
'सकाळ' ट्विटर : https://twitter.com/esakalupdate
इन्स्टाग्राम : https://www.instagram.com/sakalmedia
Email ID: Webeditor@esakal.com